परिवर्तन पर्यावरण अभियानाची इंदापूरमध्ये सांगता
पुणे । बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या तालुक्यांमध्ये 61 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. झाडे लावण्यापासून ते मोठे होईपर्यंत त्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामस्थांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गावातील शोभा वाढणार आहे. तसेच पुढील काळामध्ये संस्थेच्या वतीने विविध सामाजिक कामे करण्यात येणार असल्याचे मत ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सुनंदा पवार यांनी सांगितले.
वडापुरी (ता. इंदापूर) येथे ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ग्रो लि. व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे परिवर्तन पर्यावरण अभियानाची सांगता शनिवारी झाली. त्यावेळी 61 हजार वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचा शेवट सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, महेंद्र काळे, हरिदास माने, हनुमंत जगताप, आप्पा बंडगर, तय्यब शेख, शत्रुघ्न बागल, बाबुराव शिर्के, सोमनाथ पवार, विजय बागल, गजानन शिंदे, प्रकाश चंदणशिवे, परशुराम करगळ, शिवाजी चंदणशिवे उपस्थित होते. महिला आरोग्य, स्वच्छता, समृद्ध गाव योजना, किशोरवयीन मुलींचे आरोग्य, शेती पाणी, शेतकरी यासाठी संस्था मदत करणार आहेत. यावेळी झाडे लावणे आणि ती जगवणे ही सर्वोत्तम सेवा आहे, असे पवार यांनी सांगितले.
400 वृक्षांची लागवड
म्हसोबाचीवाडी येथे 400 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षलागवडीचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काकासाहेब वाबळे, लक्ष्मण चांदगुडे, उपसरपंच संदीप चांदगुडे, युवा उदयोजक स्नेहदीप नांदगुडे, माजी सरपंच शामराव चांदगुडे, सुजित सूर्यवंशी, रणजित सूर्यवंशी, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब चांदगुडे, तात्यासो काळे, शेखर मोहिते सुनील खंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षसंवर्धन काळाची गरज
आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही. तर सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने वृक्ष जोपासना करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले.