बारामती नगरपालिकेला पत्रकारांची अ‍ॅलर्जी!

0

बारामती (वसंत घुले)-: बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. मात्र विकासाच्या प्रश्‍नांवरती बोलताना त्यांची बोबडी वळत असल्याचे सर्वश्रुत आहे. या नगरपालिकेला पत्रकारांचे विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांचे तर फारच वावडे आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नगरपालिकेत सुरू असलेला अनागोंदी कारभार. हा भोंगळ कारभार सतत बारामतीकरांसमोर येत आहे. तो शहरापुढे ठेवण्यात काही पत्रकार तसेच वृत्तपत्र अग्रेसर आहेत. अशा परीस्थितीत आपले वाभाडे कोणी काढूच नये, असेच नगरपालिकेला वाटते. त्यामुळेच बारामती नगरपालिकेला पत्रकारांची अ‍ॅलर्जी आहे.

नगरपालिकेचा कारभार हा तीनहत्ती चौक ते पेन्सिल चौक या साडेचार किमी रस्त्याच्या हद्दीपर्यंतच मर्यादीत आहे. फक्त याच रस्त्याचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यामुळे एवढीच बारामती आहे का? असा प्रश्‍न पडतो. उर्वरीत बारामती जरा नजरेखालून घातल्यानंतर दिसणारी भयावह अवस्था अस्वस्थ करणारी आहे. मग याचे चित्रण केल्यानंतर पत्रकारांचा राग येणे स्वाभाविक आहे. नगरपालिकेच्या बैठकांना नगरसेवक मौन बाळगून असतात. हेही चित्र समाधानकारक नाही. केवळ 15 ते 20 मिनीटात बैठक आटोपायची ही प्रथा मोडावयास हवी. यासाठी वृत्तपत्रात लिहिल्यास नाराजी का व्यक्त करावी. सत्याला सामोरे जावे, असे नेल्सन मंडेला यांनी सांगितले आहे. पण इथे मात्र उलटेच चित्र आहे. त्यामुळेच की काय, बारामती नगरपालिकेला पत्रकारांची अ‍ॅलर्जी वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भ्ाुषविले आहे. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळातही त्यांनी एकला चलोरे ही भ्ाूमिका घेतली होती. संघटनात्मक पद मिळाल्यानंतर शहरात पक्षवाढीबाबत त्यांच्याकडून काम होणे अपेक्षित होते. मात्र, पक्षवाढीसाठी त्याचा कितपत उपयोग होतो. याबाबत खुद्द शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मतमतांतरे आहेत. त्यांनाच शहराध्यक्षपदाची दुसर्‍यांदा जबाबदारी का देण्यात आली हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना न सुटलेले कोडे आहे. त्यांच्याकडून कधीही पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती पत्रकार अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही दिली जात नाही. त्यामुळे केवळ अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रास्ताविक अथवा आभार मानण्यापुर्वीच त्यांची जबाबदारी आहे की काय? असा प्रश्‍न बारामतीकरांना पडतो आहे. वास्तविक पाहता बारामती शहरातील सध्य परिस्थितीचा अभ्यास केला असता खूप काही प्रश्‍नांची मालिकाच तयार होईल, असेच चित्र आहे. मात्र हे चित्र मांडण्याचे धाडस केल्यास पत्रकारांना दोष का द्यायचा.

अगदीच ताजे उदाहरण घेतल्यास शनिवारी नगरपालिकेत झालेल्या सभेला पत्रकारांना बोलविण्यास जाणीवपूर्वक टाळल्याची जोरात चर्चा सुरू आहे. शहरात विरोधक तसेच नागरीक करत असलेल्या आंदोलनामुळे नगराध्यक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे तर सोडाच मात्र मुलभ्ाूत प्रश्‍न सोडविण्यातही अपयशी ठरल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या सभेतही नगराध्यक्षांचे मौन हे विचार करायला लावणारे आहे. यामुळे आपले अपयश आणि गेल्या वर्षभरात नगरपालिकेचा चव्हाट्यावर आलेला कारभार लपविण्यासाठीच पत्रकारांना व नागरीकांना दूर ठेवण्याचा हा खटाटोप नाही ना?

नगरपालिकेच्या एकूणच कारभारावर अनेक प्रश्‍न तयार होत आहेत. ही गंभीर बाब आहे. तटस्थपणे मांडणी झाल्यास पदाधिकार्‍यांना व प्रशासनास उत्तरे देणे अवघड होऊन बसणार आहे. अनेक पदाधिकारी तटस्थपणे का वागतात. त्यांना ही परिस्थिती का कारणीभ्ाूत आहे. याचेही उत्तर नागरीकांना हवे आहे. बारामती शहर हे अमेरीकतल्या सीएटल शहरासारख व्हावं, अशी सर्वसामान्यांची स्वप्न आहेत. मात्र, नगरपालिकेचा कारभार पाहिल्यास हे अगदीच अशक्य असल्याचे म्हणाचे लागेल.