विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे गिरीश महाजनांना आव्हान
जामनेर- बारामती जिंकण्याचे स्वप्न नंतर बघा बारामती मतदारसंघातील एक गाव जे आदर्श आहे. तेेवढ जरी तुम्ही जामनेरमध्ये करून दाखविले, तर तुम्ही खरे गिरीश महाजन, काही बी करा पण बारामतीचा नाद करू नका. बारामती राहिली दूर आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेरातून निवडून येऊन दाखवा, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज जामनेरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपने धुळे, जळगाव, पालघर लोकसभा निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
कुणीही त्रामपट घेऊन आलेले नाही, की कायम सत्तेत राहिले, आज तुम्ही आमच्या जामनेरच्या सहकार्याला त्रास देता, ही जी प्रथा तुम्ही चालू केली आहे. 9 महिन्यानंतर आम्ही सत्तेत येणार आहे, परिवर्तन होणार आहे. मग तुमच कस होईल बघा, मला तर शोलेचा डायलॉग आठवतो, चुन चुन के…. आज या पिस्तुलरावांना सांगायच आहे. बारामती लांब राहिले. तुम्ही जामनेरातून निवडून येऊ दाखवा. हे आमचे आव्हान आहे. जामनेर पालिकेत मशिन मॅनेज केले, मतदारांना पैसे देता आले. विधानसभेत मशिन मॅनेज विसरून जा… खोट्या केसे केल्या जातात, कार्यकर्त्यांना दाबल जात, आमच्या सहकार्यांना दात पडेपर्यंत मारल जात, महाजन साहेब जर तुम्हाला अस वाटत असेल की तुम्हाला एकट्यालाच अस वागता येत… आणिा आज भलेही तुम्ही पोलिसाची मदत घेत असाल, तुम्ही सरकारी अधिकार्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेसला दाबवण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुमचे दिवस आता फक्त सात आठ महिन्यांचे राहिले आहेत, पुन्हा आमचे दिवस येणार आहे. तुम्हाला पडता भूई थोडी होईल…राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, जामनेरात 1700 टँकर सुरू आहेत. प्यायला पाणी नाही… काय विकास आहे. स्वतःच्या मतदार संघाच वाटोळ केल, चार निवडणुका काय जिंकल्या तुम्ही वेगवेगळे स्वप्न बघता, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी जामनेरातील भाषणात केला.