भुसावळ । उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तथा बारावी परिक्षेस मंगळवार 28 पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी भुसावळ परिसरात 42 विद्यार्थ्यांनी परिक्षेला दांडी मारली. येथील के. नारखेडे विद्यालयात परिक्षक तथा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कस्टडी अंतर्गत शहरात सहा परिक्षा केंद्रे आहेत. के.नारखेडे विद्यालय, नाहाटा महाविद्यालय, बी.झेड. उर्दू हायस्कुल, संत गाडगेबाबा हिंदी विद्यालय, डि.एल. हिंदी विद्यालय, डि.एस. हायस्कुल अशी केंद्रे शहरात आहेत.
वरणगावसाठी स्वतंत्र कस्टडी
वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात स्वतंत्र कस्टडी शिक्षणविस्तार अधिकारी सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. 3 हजार 429 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 42 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. 3 हजार 387 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय अशी चार भरारी पथके नेमण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान बारावीची परिक्षा सुरू राहणार आहे.