बारावीच्या विद्यार्थ्यांना बालभारतीतर्फे संकेतस्थळावर ई पुस्तके उपलब्ध

0

कोरोनामुळे छपाईस सप्टेंबर उजाडणार : जिल्ह्यातून पल्लवी जोशी या शिक्षिकेचा एकमेव सहभाग

जळगाव (किशोर पाटील) – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. सर्वत्र लॉकडॉऊन असल्याने छपाई बंद आहे. अशातच यावर्षीय इयत्ता पहिली व बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. छपाईस सप्टेंबर उजाडणार आहे. या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून बालभारती अभ्यासमंडळातर्फे संकेतस्थळावर कला, वाणिज्य व विज्ञान अशा सर्व विषयांची पीडीएफ स्वरुपात ई-पुस्तके ही पुस्तके 8 एप्रिल रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अभ्यासक्रम तयार करण्यात राज्यभरातून शिक्षकांमध्ये जळगाव जिल्ह्यातून एकमेव पल्लवी जोशी या शिक्षिकेचा सहभाग त्याचे संस्कृत विषयाचे पुस्तकही उपलब्ध आहे.

यावर्षीय पहिली व बारावीचा अभ्यासक्रम बदलला

बालभारती अभ्यास मंडळातर्फे आतापर्यत इयत्ता दहावीपर्यंत सर्व विषयांची पुस्तके तयार करण्यात येत होती. या वर्षापासून इयत्ता अकरावी तसेच बारावीची पुस्तके अभ्यासमंडळातर्फे तयार करण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्व लॉकडाऊन तसेच संचारबंदीचे आदेश असल्याने अत्यावश्याक सेवा सोडून सर्व आस्थापनासोबत छपाई सुध्दा बंद आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत असतो. त्यानुसार यावेळी पहिली व बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे.

क्यूआरकोड अडचणींवर मार्गदर्शन

गेल्या काही वर्षापासून बालभारती मंडळातर्फे बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे पुस्तके छपाईला विलंब होणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शन तसेच सुचनांनुसार 8 एप्रिल सुरु बारावीच्या कला, वाणिज्य तसेच विज्ञान शाखेच्या सर्व विषयांची पुस्तके बालभारती अभ्यासमंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. पीडीएफ स्वरुपात सर्व ई पुस्तके उपलब्ध आहेत. प्रत्येक विषय पुस्तकावर क्यूआर कोड उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी तसेच शंका असल्यास क्यूआरकोड स्कॅन केल्यास संबंधित विषय तज्ञ शिक्षक ऑनलाईन मागदर्शन मिळणार आहे.

जळगावचे नाव देशभरात पोहचले

बालभारतीच्या अभ्यासमंडळावर राज्यभरातील 13 शिक्षण सदस्य आहे. यात जिल्ह्यातून पल्लवी जोशी या शिक्षिकेचा समावेश आहे. त्या जळगावातील ला.ना. शाळेत उपशिक्षिका आहेत. साडेतीन वर्षापासून या संस्कृत विषयाच्या पुस्तकासाठी मेहनत घेत होते. ते पुस्तक तयार असून ते सुध्दा ई पुस्तक स्वरुपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. यानिमित्ताने जोशी यांच्या बालभारतीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकामुळे जळगावचे नाव देशभरात पोहचले आहे.