जळगाव । बुधवारी स्टेट बोर्डच्या बारावीचा निकाल लागला. फुफनगरी येथील विद्यार्थीनीने नुकतीच झालेल्या बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मित्र मंडळी काय म्हणतील या भितीने राहत्या घरी शेतात लागणार्या तणनाशक विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तातडीन मुलीस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुफनगरी येथील बारावीत शिकणारी विद्यार्थीनी प्राची विजय चौधरी (वय-16) हिने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत 48 टक्के मार्क मिळाले. त्यामुळे कमी मार्कस मिळाल्याने मित्र मंडळी काय म्हणतील याचा विचार करत घरात पडलेल्या शेतात वापरण्यासाठी तणनाशक औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता प्रकृती स्थिर आहे.