भुसावळ। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवार 13 रोजी जाहीर झाला असून बारावी नंतर दहावीच्या परीक्षेतही यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. निकाल पाहण्यासाठी शहरातील सायबर कॅफेवर दुपारी विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केलेली होती. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
सेंट अलायन्स हायस्कुलचा 98.9 टक्के निकाल
या शाळेचा निकाल 98.9 टक्के लागला. त्यात अक्षता बाळकृष्ण चौधरी 98 टक्के, अदिती अविनाश महाजन 94.80 टक्के तर सुमेधा शेखर चौधरी हिने 94.60 टक्के प्राप्त केले. यासह सिध्देश पाटील 92.60, प्रणय धांडे 91.20, जयेश पाटील 92.40, नेहा पाटील 94.40, पायल चोपडे 93.20, संकेत चौधरी 93, संस्कृती भोसले 93, गौरव जाधव 91, रुबेन ओसवाल 90, यश मोरे 92.80, अक्षत अग्रवाल 92.60, अक्षत जैन 92.60, ऋषिकेश कुळकर्णी 92 टक्के मिळाले.
सुशिलाबाई चौधरी विद्यालय
या विद्यालयाचा निकाल 58.33 टक्के लागला. यात कोमल ईश्वर लोहरी ही 65.80 टक्के मिळवून शाळेत प्रथम आली तर भाग्यश्री विनोद सावळे ही 60.60 टक्के मिळवून द्वितीय आली. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले.
कोटेचा विद्यालय
प.क. कोटेचा माध्यमिक विद्यालयाचा निकाल 92.85 टक्के लागला. यात हिमांशू संजय पाटील याने 97.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करुन शाळेचे नावलौकिक मिळविले आहे. तर योगेश सोनवणे याने 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, आदेश साळुंके 91.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तसेच रोहन प्रमोद पाटील 91.40 टक्के, दिव्या विलास चौधरी 86.80 टक्के गुण मिळाले. विद्यालयाच्या या निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, सचिव संजय सुराणा, शालेय समिती चेअरमन राधेश्याम लाहोटी, सदस्य एन.सी. मंडलेचा, शिरीष नाहाटा, निरंजन शहा, तसेच मुख्याध्यापिका संगिता राणे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.