नंदुरबार । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्हाचा 84,70 टक्के इतका निकाल लागला आहे, यंदाही या निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे, मार्च व फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्यातुन 16 हजार 231 विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्यापैकी 13 हजार 748 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, सर्वात जास्त सायन्स 94,72 टक्के इतका लागला आहे, तर आर्ट 71,95 टक्के,कॉमर्स 90,38 टक्के,या प्रमाणे शाखा निहाय निकाल लागले आहेत, शहादा तालुक्याचा सर्वाधिक निकाल 88,98 टक्के इतका लागला, दि,30 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात आला, त्यामुळे हा निकाल पाहण्यासाठी सायबर केफेवर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तळोदा तालुक्यातून इयत्ता बारावीच्या परीक्षेत 835 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी 611 असे एकून 1446 विद्याथ्यांनी फॉर्म भरला होता, त्यातून 1444 विध्यार्थिनी परीक्षा दिली , परीक्षेत 1219 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तालुक्याचा 84.42% टक्के निकाल लागला आहे.
70 विद्यार्थीनी उत्तीर्ण
शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालय कला शाखेचा एकुण निकाल 95.89 % लागला एकुण 73 विद्यार्थ्यीनीं पैकी 70 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले असुन राजपुरोहित राधिका घेवरलाल प्रथम , पठाण नौसिया रसुल खॉ 71.23 द्वितीय, निकुंभे प्राजक्ता विजय 71.07 तृतीय. दोन्ही विद्यालयात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे विभागीय सचिव प्रा संजय जाधव, वर्षा जाधव, वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य संजय राजपुत, उपप्राचार्य आर. जे. रघुवंशी, पर्यवेक्षक सुनील सोमवंशी, शारदा कन्या विद्यालयाच्या प्राचार्या एस. झेड. सैय्यद व पर्यवेक्षक एम. बी. मोरे यांनी कौतुक केले.
शहादेत निकालाची परपंरा कारम
शहादा । तालुक्यात विज्ञान शाखेचा सर्वाधीक निकाल येथील वसंतरावनाइक उच्च माध्यमिक विद्यालयाचा लागलेला आहे. तालुक्यात चांगल्या निकालाची परंपरा विद्यालयाने ठेवली आहे. विज्ञान शाखेचा एकुण निकाल 99.3 % लागला आहे. कै जि. एफ. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा एकुण निकाल 98.46 तर लोणखेडा येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 94% लागला आहे. वसंतराव नाइक उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत पवार जयश्री महेश 83.53 % प्रथम , गायकवाड सिध्दार्थ काशीनाथ 82% द्वितीय , वाघ मयुर सुनिल 81.84 तृतीय , कला शाखेचा एकुण निकाल 86.73 % लागला असुन निकम ट्विंकल संतोष 80.30 प्रथम , विजया पुरुषोत्तम पाटील 69.84% द्वितीय , सविता दशरथ सोनवणे 69.38 तृतीय.
विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के
नवापूर । येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12 वीचा आँनलाईन निकाल जाहीर झाला असुन त्यात विज्ञान शाखेचा 100 टक्के,कला शाखेचा 81.22 तर वाणिज्य शाखेचा 96.29 टक्के निकाल लागला आहे,कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवुन घवघवीत यश संपादन केले आहे यशस्वीतांचे नवापूर तालुका शिक्षण मंडळाचा अध्यक्षा प्रमिलाताई पाटील, समस्त संचालक मंडळ, प्राचार्य विनोदकुमार पाटील, उपमुख्याध्यापक भरत पाटील, उपप्राचार्य एस आर पहुरकर,पर्यवेक्षक हरीश पाटील, पर्यवेक्षिका सावित्री पाडवी,कमल कोकणी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.