भुसावळ। नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने इंटरनेटवर जाहिर केलेल्या फेब्रुवारी/मार्च 2017 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत भुसावळसह विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
पु.ओं. नाहाटा महाविद्यालय
येथील विज्ञान शाखेचा निकाल 97.53 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 89.76 टक्के तर कला शाखेचा निकाल 71.32 टक्के लागला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रथम अपूर्वा पाटील 89.69 टक्के, द्वितीय मोहित ढाके 88.92 टक्के, तृतीय राहुल सोढाई 84 टक्के मिळवून आला आहे. वाणिज्य शाखेत प्रथम प्रजोत अग्रवाल 91.38 टक्के, द्वितीय प्रतिक बेंडाळे 88.77 टक्के व तृतीय उत्कर्षा धांडे 86.46 टक्के आले आहेत. कला शाखेत प्रथम धनश्री घोडके 75.53 टक्के, द्वितीय मनोज रंदाले 75.23 टक्के व तृतीय जयश्री पाटील 74 टक्के आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, संचालक संजयकुमार नाहाटा, प्राचार्या डॉ.एम.व्ही. वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.बी. पाटील, प्रा.बी.एच. बर्हाटे, प्रा.ए.डी. गोस्वामी, प्रा.एन.ई. भंगाळे यांनी कौतुक केले आहे.
मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती
सायबर कॅफेतील गर्दी, कॉलेजमधील गुणवत्ता यादी तपासताना होणारी धाकधूक, हँग होणारी वेबसाईट यामुळे आता निकाल बघायचा तरी कसा, अशा विवंचनेमध्ये विद्यार्थी असायचे. बारावीचा निकाल म्हटल्यावर एरवी डोळ्यासमोर येणारे हे चित्र यंदा अजिबातही अनुभवायला मिळाले नाही. विद्यार्थ्यांच्या हाती आलेले स्मार्टफोन, घरोघरी असणारे इंटरनेट आणि ’एसएमएस’च्या माध्यमातून बोर्डाचा निकाल जाणून घेत असल्याचे सर्वत्र दिसले. बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन निकाल बोर्डाने मंगळवारी दुपारी जाहीर केला. यापूर्वीच्या ऑनलाइन निकालांदरम्यान सायबर कॅफेमध्ये होणारी गर्दी आणि वेबसाइट हँग होण्याचे प्रकार नित्याचेच असल्याचे दिसून आले होते. मात्र, यंदा हे प्रकार लक्षात घेत विद्यार्थ्यांनी मोबाइलवरच निकाल पाहण्याला प्राधान्य दिल्याचे शहरात दिसून आले. घरी इंटरनेटची सुविधा असल्याने घरबसल्या सहकुटुंब निकाल पाहणार्यांची संख्याही यंदा लक्षणीय असल्याचे दिसून आले. ’स्मार्टफोनवर आता सगळ्याच सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी निकाल पाहण्यासाठी गर्दी करावी लागत नाही.
कोटेचा महिला महाविद्यालय
येथील कला शाखेचा एकूण निकाल 75.55 टक्के, वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 96.60 टक्के तर विज्ञान शाखेचा एकूण निकाल 93.10 टक्के लागला आहे. कला शाखेतून स्नेहल साखरे हि 79.85 टक्के मिळवून प्रथम, वनिता धांडे ही 75.69 टक्के मिळवून द्वितीय तेजस्वीनी पाटील ही 69.07 टक्के मिळवून तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेत काजल हेडा ही 90.92 टक्के मिळवून प्रथम, ममता भालेराव 88.40 टक्के मिळवून द्वितीय तर समृध्दी फालक ही 78.46 टक्के मिळवून तृतीय आली आहे. विज्ञान शाखेतून दिक्षा पाटील 77.23 टक्के मिळवून प्रथम, धनश्री जोशी ही 76.30 टक्के मिळवून द्वितीय तर केतकी जोशी ही 74.92 टक्के मिळवून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, सचिव संजय सुराणा, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, संचालक दिपेश कोटेचा, सर्व संचालक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचार्यांनी कौतूक केले आहे.
के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
येथील विज्ञान शाखेचा एकूण निकाल 100 टक्के तर कला, वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 99 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून करण सोनवणे हा 88.31 टक्के मिळवून प्रथम, अम्मार बत्तीवाला हा 87.53 टक्के मिळवून द्वितीय तर भुमिका चोपडे ही 85.69 टक्के मिळवून तृतीय आली आहे. कला शाखेतून रूपाली गजरे ही 60.46 टक्के मिळवून प्रथम, कोमल कांबळे 57.38 टक्के मिळवून द्वितीय तर पूजा तायडे 55.54 टक्के मिळवून तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून वैभव पाटील हा 89.23टक्के मिळवून प्रथम, श्रुती नेवे ही 85.23 टक्के मिळवून द्वितीय तर भाग्यश्री शिरनामे ही 84.92 टक्के मिळवून तृतीय आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून विज्ञान शाखेतून करण सोनवणे हा 88.31 टक्के मिळवून प्रथम, वाणिज्य शाखेतून रोहित जमदाडे हा 66.46 टक्के मिळवून प्रथम व कला शाखेतून सागर जाधव हा 54.62 टक्के मिळवून प्रथम आला आहे. तर मागासवर्गीय मुलींमधून विज्ञान शाखेतून आकांक्षा सपकाळे ही 73.54 टक्के मिळवून प्रथम, वाणिज्य शाखेतून निकीता राऊत ही 67.69 टक्के मिळवून प्रथम व कला शाखेतून रूपाली गजरे ही 60.46 टक्के मिळवून प्रथम आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकवृंद व कर्मचार्यांनी कौतुक केले आहे.
म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूर
विज्ञान शाखेत प्रतिज्ञा छगन महाजन हि 73.84 टक्के मिळवून प्रथम आली. तर विनोद गोरख पाटील 69.38 टक्के, लिना जीवराम वारके 68.92 टक्के मिळाले. कला शाखेत मोहिनी सुनिल भोळे या विद्यार्थीनीने 59.23 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर राहुल लहू तायडे 57.69, उर्मिल प्रल्हाद करोशिया 57.53 टक्के मिळाले. वाणिज्य शाखेत रोशनी सुनिल चौधरी हिने 62.61 टक्के गुण मिळविले. तर रोशनी साळी 58.7, कविता चव्हाण 58.61 टक्के मिळाले