जळगाव । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परिक्षेला मंगळवारी 28 रोजी सुरुवात झाली आहे. बुधवारी दुसर्या दिवशी हिंदी विषयाच्या परिक्षेला जिल्ह्यातील दोन विद्यार्थी परिक्षे दरम्यान अनुचित प्रकार करतांना आढळल्याने त्यांना डीबार करण्यात आले आहे. यात यावल तालुक्यातील सांगवी येथील आणि भुसावळ येथील डी.एस.हायस्कुलचा समावेश आहे.
राज्य परिक्षा मंडळाच्या शुभांगी राठी यांच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत कॉफी करतांना आढळलेल्या दोन विद्यार्थ्याना डिबार केला. जिल्ह्यात बोर्डाची परिक्षा कॉफीमुक्त व्हावे यासाठी कॉफीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. मात्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसुन येत आहे. पहिल्या दिवशी देखील पथकाने कॉफी बहाद्दरांवर कारवाई केली होती. विविध प्रकारची शकले लढवून विद्यार्थी कॉफी करत असल्याचे आढळून आले. परीक्षा दालनात शिरण्या अगोदर कडक तपासणी करण्यात येत असुनही विद्याथ्यापर्यत कॉफी पोहचते कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.