बार्शी येथे २५ जूनला वंजारी समाज मेळावा,

0

सोलापूर : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. 25) बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे बहुजन वंजारी समाज मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याहस्ते व उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तींचा सन्मान सोहळा पार पडणार आहे. दैनिक जनशक्ति पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनाही या सोहळ्यात पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केले जाणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी दिली.

विविध क्षेत्रातील या मान्यवरांचा होणार सन्मान
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर (पुणे), पुरुषोत्तम सांगळे (पुणे), विजय बडे (मुंबई), डॉ. गणेश राख (पुणे), स्वातीताई मोराळे (पुणे), अ‍ॅड. गणेश शिरसाट (पुणे), दीपक नागरगोजे (बीड), संतोष गर्जे (बीड), उद्धव फड (लातूर), अभिमान मुंडे (रत्नागिरी), विशाल गरड (बार्शी), अशोक बांगर (जामखेड), संतोष ढाकणे (बार्शी), संतोष कांदे (नाशिक), दत्तू बोडके (नाशिक), किशोर गर्जे (गोंदिया), अमोल गिते (मुंबई), धनंजय गुट्टे (अहमदपूर), डॉ. हर्षवर्धन पाटील (बार्शी), संदीप ओबासेसर (कल्याण), कु. नयन बारगजे (बीड), भास्कर बडे (लातूर), कॅप्टन संजय उगलमोगले (रत्नागिरी), श्रीमती घुले मॅडम (परभणी), जुनैद आतार (लातूर), साक्षी आंधळे (बीड), ज्ञानोबा नागरगोजे (नांदेड), धनराज गुट्टे, अ‍ॅड. अशोक मुंडे (अंबाजोगाई), शांताराम जाधवर (बार्शी), गणेश तोगे (बार्शी), मल्लिकार्जुन धारूरकर (बार्शी), लक्ष्मण म्हस्के (बार्शी), सत्यभामा जाधवर (बार्शी), मेघराज दराडे (पुणे) या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी सन्मान केला जाणार आहे.

समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
वंजारी सेवासंघाच्या बार्शी शहर व तालुका शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे, प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधवर, प्रदेश सरचिटणीस अभिजित माळवे यांच्यासह बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, गटनेते दीपक राऊत, विरोधी पक्षनेते नागेर अक्कलकोटे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. राज्यातील बहुजन समाजासह वंजारी समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सेवासंघाच्या बार्शी शाखेतर्फे करण्यात आलेले आहे.