नवी मुंबई । पनवेल शहरातील बार हद्दपार करण्यासाठी महिला एकवटल्या असून, पनवेल शहरातील बार हद्दपार व्हावेत यासाठी आपला आधार फाउंडेशन प्रयत्नशील आहे. मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याने आपला आधार फाउंडेशनच्या वतीने महिलांतर्फे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांना पनवेल शहरातील बार हद्दपार करावेत यासाठी एक निवेदन व गुलाबपुष्प देऊन विनंती करण्यात आली व महिलांना बारमुळे होणारा त्रास देखील कथन करण्यात आला. यावेळी रुपाली शिंदे, राजश्री निंबाळकर, संपदा कोलगे, समृद्धी कोलगे, स्मिता जोशी व शबनुर शेख आदी महिला कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या