बालकल्याण समिती सभेस एकच सदस्य हजर

0

जळगाव। महापालिकेच्या महिला बाल कल्याण समिती सभा केवळ नावालाच असून समितीची होणार्‍या सभेला हे सदस्य उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात आज झालेल्या सभेत महिला बाल कल्याण सभापती सोडता केवळ एक सदस्य सभागृह होते. सभेच्या अजेड्यांवरील विषय मंजूर करून दहा मिनीटात सभा झाली. मात्र सभा संपल्यानंतर चार सदस्य उशीरा पोहचल्यानंतर त्यांची सभा उपस्थितीची सही घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

रजेचे अर्ज आलेच नाहीत
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सभापती कांचन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या व्यासपिठावर उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजण सैंदाणे उपस्थित होते. एका विषयावर होणार्‍या सभेत मनपा संचालित शहरातील 33 बालवाड्यांमधील 2016-17 वर्षातील 811 विद्यार्थिनी पैकी 70 टक्के हजेरी व लसिकरण झालेल्या मुलींना 500 रुपये शिष्यवृत्ती देणेबाबत विषय मंजूर करण्यात आला. सभा केवळ एका सदस्यांवर सुरू करण्यात येवून विषय कसा काय मंजूर झाला हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यातच सभा संपल्यानंतर सायराबी सपकाळे, कंचन सनकत, संगीता दांडेकर, उज्वला बाविस्कर या सदस्य सभा संपल्यानंतर पोहचल्यानंतर त्यांची सभा हजेरीबुकात सही झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महिला बाल कल्याण समितीमध्ये 9 सदस्य असून त्यात महिला बाल कल्याण सभापती आहे.