ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवर नग्न बालकाचा फोटो टाकल्यामुळे ते वादात सापडले आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत मुंबई सायबर सेलकडे तक्रार केली आहे. कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. त्यानी ही पोस्ट लगेच काढून टाकली. सामाजिक विषयावर खेद व्यक्त करताना त्यांनी मुलाचा अशा अवस्थेतील फोटो टाकला होता.
जय हो फाउंडेशनने ही तक्रार केली होती. त्यांनी लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे रक्षण आणि माहिती कायद्यान्वये ऋषी कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कपूर यांचे ट्विटरवर २६ लाख फॉलोअर आहेत. पोस्टला ६६ रिट्विट व ४७६ लाईक्स मिळाल्या होत्या.