जळगाव । सुप्रीम कॉलनीतून दहा वर्षीय उमर उर्फ गोलू या बालकास बाजारात घेऊन जाते असे सांगून परिसरात वास्तव्यास असलेली सोनाली बंगाली ही महिला बालकास घेऊन बेपत्ता झाल्याची घटना 17 जून 18 रोजी घडली होती. या प्रकरणी तपासचक्रे फिरवून महिलेसह बालकास शुक्रवार 07 जुलै रोजी छोडदल जि. परगना पश्चिम बंगाल येथुन ताब्यात घेत जळगाव आणले. सोमवारी महिलेला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भाग 05 गुरनं 154/18 भादंवी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाच्या शोध कामी पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोहेकॉ रामकिशन पाटील, पोना भरत लिंगायत, संदिप पाटील, मपोकॉ वैशाली पावरा यांची टीम पश्चिम बंगालमध्ये रवाना करण्यात आली होती. पोेलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक अनिरूध्द अढाव यांनी दिलेल्या मार्गदर्शनात या टिमने तपास चक्रे फिरविली. अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचेही या तपासाला मागर्दर्शन लाभले.