बालकास हृदय शस्त्रकियेसाठी मुख्यमंत्री निधीतून 1 लाख

0

शिरपूर । शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील वास्तव्यास असलेले रविंद्र नारायण वाघ यांचा 4 महिन्यांचा मुलगा आराध्य वाघ याचा हृदयाला जन्मापासून छिद्र असल्याने त्याचा शस्त्रकियेसाठी मोठा खर्च लागणार होता. त्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रूपयांची मदत मिळाली असून शिरपूर येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या सहकार्याने व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांचे स्विय सहाय्यक प्रितम झाल्टे यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रूपये मिळाले.

4 महिन्याचा मुलगा आराध्य यास उपलब्ध झाला निधी
भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांचे वारूड येथील नातलग असलेले रविंद्र वाघ यांच्या 4 महिन्याचा मुलगा आराध्य वाघ यास हृदयाला जन्मापासून छिद्र असल्याचे निदान झाले होते. रविंद्र वाघ यांची आर्थिक परिस्थीती सर्वसाधारण असल्याने त्यांना हा खर्च करणे शक्य होत नव्हते . यासाठी त्यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांचेकडे मदतीसंदर्भात विचारणा केली होती. तेव्हा अरूण धोबी यांनी जिल्हाध्यक्ष बबनराव चैधरी यांच्या सहकार्याने रोहयो मंत्री रावल यांचे स्वियसहाय्यक प्रितम झाल्टे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून हृदय शस्त्रकियेवर उपचारासाठी 1 लाख रूपये मंजूर झाल्याचे व वाडीया हॉस्पिटल मुंबई येथे पैसे जमा झाल्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चैधरी यांचे हस्ते रविंद्र नारायण वाघ यांना सत्यवचन संपर्क कार्यालय शिरपूर येथे देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे, भाजपा जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, प्रशांत चौधरी, विक्की चौधरी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदू माळी, राधे चौधरी, राजाराम पाटील, दत्तात्रय निकम आदी उपस्थित होते.