नवापूर। शहरात श्री गुरूपौर्णिमाचा शुभ मुहूर्तावर महिला पतंजली योगसमिती व विद्या कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी व महिलांसाठी वाचन संस्कृती जपवु याहा कार्यक्रम राबविण्यात आला. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. महिला पतंजली समितीच्या प्रभारी महानंदा पाटील यांनी महिला व विद्यार्थाकडुन ध्यान,प्राणायाम करून घेतले. आजच्या दिवशी या कार्यक्रमाचा माध्यमातून बालगोपालांसाठी ग्रंथरूपी खजिना उपलब्ध करून दिला. मुलांनी अत्यंत उत्साहाने पुस्तक वाचन व निरीक्षणाचा आनंद लुटला विद्या कोचिंग क्लासचा प्रमुख जयश्री पाटील यांनी मुलांसाठी मोफत वाचनालयाची घोषणा केली.दर रविवारी विद्यार्थासाठी वाचनालय खुले असणार असुन याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
ग्रंथभेट देऊन वाचनालयाला शुभेच्छा
महानंदा पाटील यांनी पतंजली योग समितीतर्फ ग्रंथभेट देऊन वाचनालयाला शुभेच्छा दिल्या. यावेळी विजया जडे यांनी ग्रथांचे महत्त्व विषद केले. विद्या चौधरी, मंगला चव्हाण,मेघा बिरारीस,ज्योती चौधरी, पल्लवी खैरकर,रेखा पाटील,सुनंदा पाटील,रेखा बागड,उज्ज्वला वडनेरे, नलिनी वाणी,अंबिका चौधरी,प्रभा पाटील,अंजला दूसाणे, सुरेखा जाधव,विना चव्हाण,जयश्री सोनवणे आदिनी परिश्रम घेतले. प्रास्तविक विद्या चौधरी यांनी केले.तर आभार प्रियंका पाटील यांनी मानले.