जळगाव : जननायक थिएटर गृप व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन तसेच रोटरी क्लब जळगाव यांच्या अंतर्गत बालनाट्य शिबीराचा समारोप झाला. यावेळी आमदार राजुमामा भोळे, व्यवस्थापक अनिल जोशी, जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोतकर, विधीज्ञ महेश भोकरीकर, रोटरीचे सचिव कृष्णकुमार वाणी यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षण शिबीरात 40 जणांनी घेतला लाभ
कला हे लोकांपर्यंत पोहचव÷ण्याचा सर्वात प्रभावी माध्यम आहे. या शिबीराचा योग्यपणे उपयोग करावा असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी समारोप प्रसंगी केले. या प्रशिक्षण शिबीरात 40 शिबीरार्थींचा समावेश होता. शिबीरात नाट्य, नृत्य, संगीत, अभिनयाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, कल्पनात्मक लिखाण, मूकनाट्य, नाट्यखेळ, नाटकाचे प्रकार व इतर विषयांबाबत राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर सन्मानित व उत्कृष्ट कामगिरी करणारे रंगकर्मी होनाजी चव्हाण, अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, दर्शन गुजराथी, नेहा पवार यांनी मार्गदर्शन केले. आपल्या मुलांनमध्ये दर्जेदार कलावंत आणि रसिक निर्माण व्हावा या मुळ अनुशंगाने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बेटी बचाओ-बेटी पढाओ असा संदेश देऊन जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोतकर यांच्या हस्ते शिबीरार्थी प्रशस्ती पत्र देण्यात आले.
शिबीर यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
शिबीर यशस्वीतेसाठी राहुल पवार, संदीप काबरा, साजीदभाई शेख, डॉ.राधेश्याम चौधरी, योगेश भोळे, अनिल जोशी, फारूख शेख, कल्पेश झांबरे, सागर भडंगर, स्वप्नील गायकवाड, रपी गुजराथी, वासुदेव सोनार, पियुष तोडकर, दिपाली हटकर, पूजा सुरळकर, कबीर परदेशी, नेहा गुरसाळे, नंदिनी चौधरी, भारती पाथकर, मनोज धारकर, गणेश सोनार, निवृत्ती इंगळे, चेतन चौधरी, गणेश साळवे, निलेश वाणी, महेश बाविस्कर, अशोक बडगुजर, महेंद्र बाविस्कर, भुवनेशे नेवे आदीनी परिश्रम घेतले.