बालनाट्य शिबिराला उत्साहात सुरुवात

0

चाळीसगाव-येथील रंगगंध कलासक्त न्यासमार्फत आयोजित बालनाट्य शिबिराचे उत्साहात उदघाटन झाले. ११ ते १७ नोव्हेबर दरम्यान चालणाऱ्या या शिबिराचे उदघाटन फोस्टर किडस् स्कूलच्या संचालीका प्राचार्य श्रध्दा ठाकूर, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालीका जयश्री भोकरे व प्रशिक्षक नाट्यशास्रात पी.एच.डी.धारक, शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील प्राध्यापक, सृजन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक व चाळीसगावचे भूमीपुत्र प्रा. डॉ किरण लद्दे यांचे हस्ते झाले.

कार्यक्रमाचे सुरूवातीला जेष्ठ रंगकर्मी दिवंगत लालन सारंग यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. रंगगंधचे सहकार्यवाह प्रविण अमृतकार यांनी प्रास्ताविकात रंगगंधचे रौप्यमहोत्सवी वर्ष व मागील महिन्यातील बालनाट्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर या शिबिराच्या आयोजनासंदर्भातील माहिती विषद करून यातील निवडक विद्यार्थ्यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच आपण व आपल्या परिचयातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्याध्यक्ष प्रकाश कुलकर्णी व आरती पुर्णपात्रे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या उदघाटक श्रध्दा ठाकूर यांनी आपल्या मनोगतात या शिबिराला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्यात. पालकांतर्फे योगेश भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशिक्षक प्रा. किरण लद्दे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना अशा नाटकाच्या सर्वागीण ओळख देणाऱ्या या शिबिरातून बाल कुमारांचा नेतृत्वगुण,संवादकौशल्य,सभाधीटपणा असा सर्वागीण विकास होऊन त्यांच्यात कलेची गोडी निर्माण होणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या टीप्स दिल्यात.सदर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यवाह शालीग्राम निकम यांनी केले. कार्यक्रमा दै.जनशक्तीचे उपसंपादक अर्जुन परदेशी, गुरुकुल शाळेचे डॉ.हरीष दवे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ महेश पाटील, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष योगेश भोकरे, फुल्ल आवारे, दिपक पाटील आदी उपस्थित होते.