वरणगाव । लहानपणापासून पालकांनी आपल्या मुलांना सकाळ संध्याकाळ दात स्वच्छ करण्याची सवय लावल्यास नक्कीच उतारवयात दात तुमचे साथ देवून तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन दंतरोग तज्ञ डॉ. यशेंद्र पाटील यांनी मांडले. विशेष आरोग्य वर्ष -2017 या अभियाना अंतर्गत जेष्ठ नागरिक संघ गणेश कॉलनी आणि परिसर आयोजित वृद्धापकाळ-दंत आरोग्य या विषयावर ते बोलत होते.
जेष्ठांच्या शंकांचे केले निरसन
यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंका निरसन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक धनराज पाटील, आभार प्रभाकर झांबरे तर स्वागत गीत यमासा भावसर यांनी केले.
नविन पध्दती विकसीत
पुढे ते म्हणाले की, आता उतारवयात संपूर्ण दंत कवळी बदलवण्याची नवीन पद्धती विकसित झाली असून त्या फार कमी त्रासदायक आहेत. कधीही दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलायम ब्रशणे दात साफ करावेत. तसेच पुढे असलेले दात मागे व सरळ करणे, हिरड्यांचे आजार, कृत्रिम कवळी आदी वर सखोल चर्चा करण्यात आली.