बालभारतीमध्ये रंगला तिहेरी प्रकाशन सोहळा

0

पुणे:साहित्यिक आबा महाजन यांच्या ‘गमतीच्या राज्यात’ ‘2 कॉफी मग्ज’ व ‘मुलांनो या फ्रेम’ पुस्तक आणि कवितेचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनचा तिहेरी प्रकाशन सोहळा दिमाखात पाडला. बालभारतीच्या हॉल मध्ये कार्यक्रम संपन्न झाला . या पुस्तकाचे प्रकाशन बालभारतीचे किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे तसेच बालसाहित्यकार ल .म कडू यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

यावेळी ल म कडू यांनी विविध असे किस्से सागतं कार्यक्रमात रंगत आणली. तर किरण केंद्रे ,राजीव तांबे यांनी आपले बालसाहित्य विषयीचे विचार मांडले. आबा महाजन मनोगत व्यक्त करताना म्हणाले बाल साहित्यामध्ये 1994मध्ये किशोर मासिकात पहिली कविता लिहली होती .

बालसाहित्यमध्ये गमभन व किशोर मासिकाचे मोठे लाभले योगदान आहे.या कार्यक्रमाला आवर्जून आश्लेषा महाजन, स्वाती राजे ,डॉ संगीता म्हैसकर विदा पिंगळे ,जयदीप कडू उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गमभन सर्व सदस्य देखील हजर होते.