बालमृत्युच्या प्रमाणात घट

0

जळगाव । जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे विविध योजना यशस्वीपणे राबविण्या येत असुन त्याअंतर्गत बालमृत्युचे प्रमाण घटल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दिली. भविष्यात बालमृत्युचे प्रमाण शून्य राहिल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील बालमृत्युचे प्रमाण मागिल चारवर्षापासुन सातत्याने घटले आहे. या पुढे देखील ग्रामिण, स्थानिक, जिल्हापाळीवर उपाययोजना आखण्यात येणार आहेत. 2015 मध्ये जिल्ह्यात 779 बालकांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये हे प्रमाण 589 वर आले व 2017 मध्ये 609 तर 2018 मध्ये 556 बालकांचा मृत्यू झाला. राज्यातील बालकांच्यामृत्यूचा दर 19 टक्के असून जिल्ह्याचे प्रमाण 11 टक्के आहे. सध्या असलेले बालकांचे मृत्युचे प्रमाण आणखी कमी करण्यात येणार असून त्याविषयी सर्वच पातळीवर प्रयत्न करण्यात येतील व हे प्रमाण शून्य करू, असे दिवेकर यांनी सांगितले.

स्मार्ट कार्डवर डेटा उपलब्ध
चाळीसगाव तालुक्यातील व इतर ठिकाणांतील उसतोड कामगार महिला व अन्य महिला स्धलांतरीत होत असतात यामुळे उपचार होण्यास अडचणी येतात, तसेच उपचारामध्ये तफावत होते. यासाठी स्मार्टकार्ड उपलब्ध करुन महिलांचा उपचाराचा सर्व डेटा त्यात असेल व त्या स्मार्टकार्डच्या आरसीएच कोडच्या माध्यमाने महिलेला किती उपचार करण्यात आले आहेत. याविषयी संपुर्ण माहिती लगेच मिळेल. दरम्यान त्या अनुषंगाने वैद्यकिय अधिकार्‍याला उपचार करणे, सोपे होईल व महिलेला पूर्ण फायदा होईल.

दहा दिवसांत काम पुर्ण करण्यात येणार
विभागीय आयुक्तांकडून नरेगा अंतर्गत सिंचन विहीरींचे कामे पुर्ण करण्याबाबत उदिष्ट देण्यात आले होते. याअंतर्गत एप्रिल महिन्यातील 275 विहीरींचे काम पुर्ण करण्यात आले असुन मे महिन्यातील 465 विहीरींपैकी 150 कामे अपुर्ण आहे. तसेच जुन महिन्यात 671 विहीरींची कामे पुर्ण करण्यात येणार असुन येत्या 10 दिवसात अपुर्ण विहिंरींची सर्व कामे पुर्ण करण्याच्या सुचना आज आढावा बैठकीत सिईओ यांनी दिल्या आहे.

275 विहिरींची कामे पूर्ण
पंतप्रधान आवास योजनेच्या 2016-17 मधिल 5 हजार 563 कामे अपुर्ण असुन नरेगा अंतर्गत असलेल्या सिंचन विहारींची कामे देखील पुर्ण करण्याच्या सुचना आज झालेल्या समन्वय बैठकित सुचना दिल्या असुन जिल्ह्यातील अधिकार्‍यांची समन्वय सभा आज शुक्रवारी 25 रोजी सिईओ शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहु महाराज सभागृहात पार पडली. या बैठकीत सीईओंनी अधिकार्‍यांकडून विविध योजनेंचा आढावा घेत असतांना पंतप्रधान आवास योजनेतील 5 हजार 563 घरकुलांची कामे अपुर्ण असुन त्यात काही घरकुलांची पाया लेव्हल,स्लॅब लेव्हल, व शौचालये पुर्ण नाही अशा अपुर्ण कामांना या तिन पध्दतीने वर्गवारी करण्यात आली. त्यानुसार योजनेअंतर्गत कामेपुर्ण करण्याच्या सुचना सिईओ शिवाजी दिवेकर यांनी आढावा बैठकीत दिल्या.