बालविकास मंदिरात चिमुकल्यांचे रक्षाबंधन

0

अमळनेर । येथील कै अरुणाबाई गुलाबराव पाटील बालविकास मंदिर अमळनेर या शाळेत शनिवार 5 ऑगस्ट रोजी बालवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील स्नेहबंध कायम स्वरूपी टिकावा म्हणून रक्षाबंधनाचे औचित्य साधून वर्गातील आपल्या सोबत शिक्षणाचे बाळकडू घेणार्‍या आपल्या भाऊरायला रक्षणाची जबाबदारी बालवयातच बहाल केली.

असा हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवून मुख्याध्यापिका रुपाली वाघ व त्यांच्या सहकारी शिक्षिका यांनी सामाजिक बांधिलकी जपली व आपल्या मुलांना भाऊ-बहिणीचे अतूट नाते घट्ट करायला दिशा दिली. यावेळी साने गुरुजी विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका मेघा देवरे, अनिल पाटील, पालक सदस्य शांताराम बोरसे व सर्व विद्यार्थ्यांचे आई-वडिलांनी उपस्थिती दिली.