बालसंस्कार मंडळ एज्यु. सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी

0
यावल – येथील बाल संस्कार मंडळ एज्यु . सोसायटीची सन २०१८ ते २०२१ या कालावधी साठी दि.११ ते ३० सप्टेंबर २०१८ या दरम्यान निवडणूक प्रक्रिया होऊन अध्यक्ष पदी महेश वासुदेव वाणी यांची बिन विरोध निवड करण्यात आली .
पुढीलप्रमाणे कार्यकारी मंडळाची  निवड
 महेश वासुदेव वाणी ( अध्यक्ष ), डॉ . सतीष सुपडू यावलकर ( उपाध्यक्ष ),  श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले ( सचिव ),  संतोष श्रीहरी कवडीवाले ( सहसचिव ), ईश्वरलाल राजाराम वाणी ( कोषाध्यक्ष ), डॉ . जिवन वासुदेव यावलकर ( कार्यकारी सदस्य ),   तेजस सतीष यावलकर ( कार्यकारी सदस्य ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून प्रा . पी . आर . पाटील ,  जळगांव यांनी कामकाज पाहिले.  सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने संस्थे मधे विविध उपक्रम राबवुन संस्थेच्या व शाळेच्या  नावलौकीकात आधिकची भर घालुन डिजीटल शाळा बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष महेश वाणी यांनी सांगीतले .