जळगाव । येथील रोटरी मिडटाऊन क्लबतर्फे प्रांतपाल डॉ.के.एस.राजन यांच्या उपस्थितीत बाल सुधार गृहातील (रिमांड होम) विद्यार्थ्यांना नितीन मकासरे यांच्यातर्फे देण्यात येणार्या तीन महिने मोफत संगणक हार्डवेअर प्रशिक्षण कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रमेश जाजू यांच्या सहकार्याने क्लबतर्फे ई-लर्निंग किट सुद्धा देण्यात आले. व्यासपीठावर सहप्रांतपाल ऍड. प्रविणचंद्र जंगले, अध्यक्ष डॉ.अपर्णा मकासरे, मानद सचिव डॉ.उषा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रांतपाल डॉ.राजन यांच्या हस्ते क्लबच्या ‘सुवर्णपत्र’ या बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष डॉ.मकासरे यांनी झालेल्या प्रकल्पांविषयी तर मानद सचिव डॉ.शर्मा यांनी मिटींग विषयी कार्य अहवाल सादर केला. डॉ.राजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास डॉ.सुमन लोढा, किशोर सुर्यवंशी, अनिल अग्रवाल, आनंद खांबेटे, लिलाधर चौधरी, डॉ.चंद्रकांत कोतकर, प्रविण खडके, छाया पाटील, शेखर प्रभुदेसाई, मनोज पाटील आदिंसह रोटरी परिवारातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.