बालिका समृद्धी योजनेत फसवणूक

0

नवापूर । बालिका समृद्धी योजनेअंतर्गत फसवणूक झाल्याची तक्रार सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने जिल्हाधिकारी व प्रांतअधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुली साठी बालिका समृद्धी योजना ही 2005 चा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत आदिवासी मुलींचे शाळेची गळती कमी होईल, आदिवासी मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल, मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत होती, आज हीच योजना सुकन्या योजना, जयश्री योजना नाव बदलून मुलींसाठी योजना राबविली जात आहे.

आंदोलन छेडण्याचा इशारा

दि 14 फेब्रुवारी रोजी आदिवासी प्रकल्प अधिकारी नंदुरबार व प्रांत अधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले. सदर फसवणूक झालेल्या मुलींना त्वरित बालिका समृद्धी योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा सदर मुली पालकांसह सत्यशोधकचा नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडतील याची दखल घेऊन कारवाई करावी अशा इशारा व मागणी कॉ आर. टी. गावीत, कॉ रामसिंग गावीत, कॉ करणसिंग कोकणी, कॉ नकट्या गावीत, कॉ रंजीत गावीत, कॉ होमाबाई गावीत, कॉ साजुबाई गावीत, कॉ गेबाबाई गावीत, कॉ कांतीलाल गावीत यांनी दिला आहे.

दाखल अर्जदारांची चौकशी

2005 मध्ये बालिका समृद्धी योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यात हजारो मुलींचे अंगणवाडी तर्फे पंचायत समिती महिला बालविकास विभागामार्फत फार्म भरून घेण्यात आले. त्यावेळी लाभार्थी मुलींचा पालकांना सांगण्यात आले होते की, महिन्याला 500 रूपये या प्रमाणे स्कॉलरशिप ही या योजने अंतर्गत देण्यात येईल. ही रक्कम मुलींचे 18 वर्षे किंवा इयत्ता दहावी नंतर एकञ रक्कम ही पुढील शिक्षणासाठी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र आज ज्यावेळी मुलींना ही स्कॉलरशिप देण्याची वेळ आली तेव्हा पंचायत समिती मार्फत अंगणवाडी बीट प्रवेशिका यांना दाखल अर्जदारांची चौकशी करण्यास सांगितले.

लाभार्थ्यांना नाहक होतोय त्रास

आज लाभार्थी जेंव्हा ही रक्कम काढावयास जात आहेत त्यावेळी त्यांना रिकाम्या चकरा माराव्या लागत आहेत. सदर मुली व पालकांना सांगण्यात आले की, तुमचे अंगणवाडी सेविका व मुलीचे ज्वाईन्ट खाते आहे का? नसेल तर खोलून घ्या नाही तर तुमच्या मंजूर निधी परत जाणार आहे. तेव्हा याबाबत महिला व बालकल्याण अधिकारी यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की सदर योजना बंद झाली आहे. त्यामुळे सन 2005 मध्ये फार्म भरलेल्या मुलींना मंजूर निधी देता येत नाही, सर्टीफिकेट आहे का? असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

काय आहे योजना

’समृद्ध बालिका देश का भविष्य’ हे ब्रीद घेऊन कार्यान्वित झालेल्या बालिका समृद्धी योजनेचा किमान एक हजार रुपये भरून लाभ घेता येतो. स्त्रीभ्रूण हत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून, मुलींचा जन्मदरही घसरला आहे. या प्रकाराने अनेक गंभीर समस्या देशासमोर उभ्या ठाकल्या. यावर उपाययोजना म्हणून केंद्र राज्य शासनाच्या अनेक योजना कायदेही तयार करण्यात आले आहेत. परिणामी, थोडाफार बदल दिसून आला, मात्र समस्यांचा डोंगर उभाच आहे. या समस्येमुळे देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलली. बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा देत त्यांनी समृद्ध बालिका देश का भविष्य’ ओळखून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलीच्या जन्मापासून या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान हजार रुपये वार्षिक भरावे लागतात. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत रक्कम जमा करता येते. खाते उघडल्यापासून 14 वर्षांपर्यंत खात्यात रक्कम जमा करता येते. 21 वर्षांनंतर खाते परिपक्व होते.