बालिकेवरील बलात्काराचा गवळी समाजातर्फे निषेध

0

चाळीसगाव । गवळी समाजाच्या चार वर्षीय चिमुरडीवर सुभाष बंदेगव्हार (रा. नासिक) याने बलात्कार केल्या प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई व फाशीच्या शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन समस्त गवळी समाजाच्यावतीने देण्यात आले. 11 मे रोजी नासिक रोड येथील गवळी समाजाच्या चारवर्षीय चिमुरडीवर सुभाष बंदेगव्हार या नराधमाने अमानुषपणे बलात्कार केल्याची घटना घडली. सध्याची परिस्थिती पाहता सामाजिक वातावरण अत्यंत दुषित झाले आहे. तरूण मुलीबरोबर लहान चिमुरडी मुींचेही आयुष्य धोक्यात आले आहे. माया- बहिणींनी बाहेर पडावे की नाही असा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. माता भगिनी घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित रहाव्यात, यासाठी अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाल्यास या गोष्टींवर आळा बसेल तसेच या चिमुरड्या मुलीला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.

विरशैव लिंगायत गवळी समाज चाळीसगाव या क्रुर व माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा होईल अशा विधीतज्ञाची शासनाच्यावतीने नेमणूक होवून स्वतंत्र खटला न्यायालयात तातडीने चालवावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर नगरसेविका संगिता गवळी, नगरसेविका अलका गवळी, सामाजिक कार्यकर्ते किर्ती गवळी, सामाजिक कार्यकर्ते नंदा गवळी, विजय गवळी, सुपाजी गवळी, शेखर साठे, तुकाराम गवळी, संदीप गवळी, आवडा गवळी, किशोर झारखेडे, लक्ष्मी गवळी, वस्तलाबाई गवळी, रूपाली गवळी यांच्यासह समाज बांधवाच्या स्वाक्षर्‍या आहेत.