जळगाव । दुचाकी चाबी घेण्यासाठी गेलल्या सात वर्षीय बालिकेवर 42 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना मोहाडी रोड परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये 15 एप्रिल रोजी घडली. दुचाकीची चाबी घेण्यासाठी चिमुरडी वरच्या मजल्यावर राहणार्या हिरामण चौधरी यांच्या घरी गेली. घरी कोणी नसल्याची संधी साधत नराधमाने बालिकेवर अत्याचर केला. मुलीची आई त्या ठिकाणी वेळेत पोहचल्यावर अनर्थ टळला.
मेहरूणमधील घटना
नरधमाने त्या ठिकाणाहून पळ काढला. काही दिवसापूर्वी मेहरुणमध्ये अशी घटना डली होती. अशा घटना वारंवार घडत आहेत. या नराधमांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. तरी पसार झालेल्या या नराधमाचा शोध घेवून असे कृत्य करणार्या नराधमाला कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष नितीन अस्मार, जळगाव तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
29 वर्षीय युवक बेपत्ता
मनिष प्रकाश चौधरी हा 29 वर्षीय युवक 15 रोजी सकाळी 9 वा. दाणाबाजार येथे तो करत असलेल्या हमालीच्या कामासाठी जात असल्याचे सांगुन गेला तो परत आला नाही.म्हणून हर्षा अनिल चौधरीच्या फिर्यादिवरुन शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. मनिष हा रंगाने सावळा, गोल चेहरा, कुरळे केस, उंची 5 फुट 5 इंच या वर्णनाचा आहे. तपास पो.ना.राजेंद्र परदेशी करत आहेत.