बालिकेवर अत्याचार करणार्‍यास फाशीची मागणी

0

जळगाव । मुक्ताईनगर येथील एका सहा वर्षीय बालीकेवर परप्रांतिय नराधामान अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गणेश विसर्जनाच्या एकांताचा फायदा घेऊन या नराधामाने चिमुरडीवर अत्याचार केले. सदरील घटना निंदनीय असून मानुष्किला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा गोरसेनेच्या वतीने तिव्र निषेध नोंदविला जात आहे. चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या नराधामास अटक करुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गोरसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन गुरुवारी 8 रोजी निवासी जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांना देण्यात आले.

फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत खटला चालवावा
सहावर्षीय पिडीतेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित आरोपींवर तातडीने आरोपपत्र दाखल करुन सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालविण्यात यावा. तसेच शासनाने निर्देशित केलेल्या मनोधैर्य योजनेतून पिडीत कुटुंबीयास शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी निवेदनकर्त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे. घटनेकडे दुर्लक्ष केल्यास गोरसेनेचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी अ‍ॅड.सागर राठोड, चेतन जाधव, राजपाल पवार, अभिजीत चव्हाण, सुनिल नाईक, आकाश राठोड, दिपक जाधव, योगेश पवार, रमेश चव्हाण, उत्तम चव्हाण, प्रेम जाधव, पंडीत चव्हाण, सागर राठोड, विजय महाराज, अशोक चव्हाण भारमल नाईक, अनिल राठोड, प्रविण पवार आदींची उपस्थिती होती.