सोयगाव । तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड (वय15) ही गावाबाहेर असलेल्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता, गावातीलच एकाने तिच्यावर पाळत ठेवून शेतातील एका फार्महाऊसवर तिला विहिरीजवळून उचलून आणले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. बालिकेने विरोध केल्यान गळा आवळून दगडाने ठेचून खून केल्याची घटना 14 रोजी घडली.
अल्पवयीन आरोपींनी दिली कबुली
बालीकेने अत्याचार करण्यास विरोध केल्याने अल्पवयीन बालिकेच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून दगडाने ठेचून तिचा खून केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिल्याने, चौकशीसाठी ताब्यात घेतले तसेच चार आरोपींना मंगळवारी 18 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी भुरा पवार, मुश्ताक यांच्यासह चौघांनी तिला विहिरीवरून उचलून शेतातील फार्महाऊसवर उचलून आणल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक डॉ.आरतीसिंग यांनी आरोपींना अटक केली. आरोपींनी कबुली दिल्याने हत्येचा कट उघडकीस ाला आहे. दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी किशोर नवल राम यांनी हनुमंतखेडा गावास तातडीची भेट देवून पिडीत कुटुंबियांचे सांत्वन केले. पोलीस निरीक्षक सुजित बडे, सहायक निरीक्षक शंकर शिंदे, गणेश जागडे, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, नीरज राजगुरु, सुभाष पवार, योगेश झाल्टे, दीपक पाटील, सतीश पाटील आदींनी आरोपीचा शोध
घेतला.