बालेकिल्ले राखण्यात यश

0

मुंबई । उ त्तरपूर्व मुंबईत शिवसेना भाजपाने गड राखला असून भांडूपमधील शिवसेनेच्या उमेदवारांनी सेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला. तर घाटकोपरमध्ये भाजपाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. उत्तर पूर्व मुंबईत एकूण 39 प्रभागांपैकी शिवसेना 13, भाजपा 12, उमेदवारांनी बाजी मारली, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 3, समाजवादी 5, मनसे 2 आणि एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. याप्रभागात मनसे, काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रभाव कमी झाला आहे. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाने पाच जागांवर आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे भाजपा, सेनेच्या उमेदवारांनी आपापल्या बोलकिल्ल्यात विजय मिळवत त्यांनी यश मिळविले आहे. महानगर पालिकेसाठी मनसेची मोठे नुकसान झाले असून कमी प्रमाणावर उमेदवार आले आहे.

उध्दव ठाकरेंच्या सभेचा सावंतांना फायदा
भांडूपमधील शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला रमेश कोरगावकर यांनी प्रभाग क्रमांक 115 मध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापले होते. याचाच फायदा शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांना झाला. भाजपाचे जितेंद्र घाडीगावकर यांचा पराभव झाला. भांडुप पूर्वेकडे धनंजय पिसाळ यांना धक्का बसला आहे. भाजपा नगरसेवक मंगेश पवार यांच्या पत्नी सारिका पवार यांनी त्यांच्या पत्नीला धोबीपछाड देत विजय मिळविला आहे. एस वॉर्डमध्ये भांडुप राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे यांच्या एकाच सीटवर समाधान मानण्याची नामुष्की ओढवली.

आमदार तारासिंगांनी गड राखला
उत्तर पूर्व मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांनी पुत्र व पक्षात नुकतेच आलेल्याला उमेदवारी दिल्याने आमदार सरदार तारासिंग यांची नाराजी ओढावून घेतली होती. यामुळे मुलुंडमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाचे अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मुलुंडचा 20 वर्षापासून भाजपाचा गड आमदार तारासिरगने राखला आहे. त्यांच्याच उमेदवारांना संधी न दिल्याने तारासिंगही निवडणूकीच्या मैदानात उतरले. या मतदारातसंघात भाजपाने सहा जागांवर विजय मिळविला.

मेहतांची पत घसरली
शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या पत्नीचे नगरसेवकपदाचे स्वप्न काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांच्या विजयामुळे धुळीस मिळाले आहे. घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता यांचे वर्चस्व आहे. तरीदेखील या भागात त्यांना भाजपाच्या दोन उमेदवारांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने घाटकोपरमधून बंडखोरी करत अपक्ष उभ्या राहिलेल्या सुधीर मोरेच्या वहिनीने विजय मिळवल्याने सेनेला धक्का बसला. घाटकोपरे मध्ये जरी प्रकाश मेहता यांचे वर्चस्व असले तरी त्याची नियोजनाची पत एकंदरीत घसरली.