पिंपरी-चिंचवड : दुसर्या मजल्याच्या बाल्कनीत खेळत असताना खाली पडून एक वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काळेवाडी येथील तापकीर नगरपरिसरात सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. रुद्रा अमोल मंजाळ (वय एक) त्याचे नाव आहे.
रुद्रा हा सकाळी दुसर्या मजल्याच्या बाल्कनीमध्ये खेळत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरातील चिमुकला दगावल्याने मंजाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.