बाल निरीक्षणगृहात शाडू मातीच्या गणेश मुर्तींचे प्रशिक्षण

0

जळगाव । शहरातील बाल निरीक्षण गृह ( मुलींचे व मुलांचे) येथे पर्यावरपिुरक शाडू मातींच्या गणेश मुर्ती बाविण्याचे कार्यशाळा लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील येथील विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते.

याप्रसंगी सामाजिक वनविकरण विभागाचे लागवड अधिकारी मधुकर नेमाडे, महाराष्ट्र हरितसेना सदस्य प्रवीण पाटील, विकास वाघ, कारागृह अधिक्षक सुनिल कुंवर, परिविक्षक अधिकारी जयश्री पाटील व डॉ.सुनिता चौधरी उपस्थित होते. शाडूच्या मातीच्या मुर्तींमुळे पर्यावरणास हानी पोहचत नाही, याहेतूने प्रवीण पाटील यांनी बाल निरीक्षण गृह येथे 35 विद्यार्थी व विद्यार्थींनींनी शाडू मातीच्या गणेश मुर्तीं बाविण्याचे प्रशिक्षण दिले. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुनिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी बालकांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनीही गणरायाची मृर्ती बनविली.