बाल मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी चांगल्या दर्जाच्या सुविधा देणार

0

जळगाव । जिल्ह्यात बालकांसाठीच्या उपचाराच्या सुविधा तोकड्या असल्यामुळे बालकांचे मृत्युचे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यु दरात झालेली वाढ कमी करण्यासाठी गोदावरी फाऊंडेशनच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागामार्फत चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी खा.डॉ उल्हास पाटील यांनी सांगितले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नव्याने सुरू झालेल्या नवजात शिशु व लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात सेंट्रल ऑक्सीजन, सेंट्रल सक्शन, वॉर्मर, इन्फुजन पंप, सी पेप, व्हेंटीलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, समर्पक नर्सिंग स्टाफ, नवजात शिशु तज्ञ 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवजात बालकांवर आता उपचार सहज शक्य
कमी वजनाचे बाळ, वेळे आधी जन्माला आलेले बाळ, सेप्टीसिमीया, काविळ, जन्मजात विकृती, न रडलेले बाळ, अशा नवजात शिशुंना वेळीच उपचाराची गरज असते. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या माध्यमातुन आता अशा बालकांवर उपचार सहज शक्य झाले असल्याचे नवजात शिशु तज्ञ डॉ. सुयोग तन्नीवार यानीं सांगितले.

पीआयसीयु फायदेशीर
वय 1 ते 17 व्या वर्षापर्यंतच्या बालकांवर पीआयसीयुमार्फत उपचार केले जातात. अत्यवस्थ असलेली बालके, लहान मुले, यांच्यासाठी व्हेंटीलेटरसह इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे बालरोग तज्ञ डॉ. अभिजीत देशमुख यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात जेष्ठ फिजीशियन डॉ चंद्रया कांते, अधिष्ठाता डॉ एन एस आर्विकर, हृदयरोग तज्ञ डॉ रमेश माळकर, बालरोग व निओनेटॉलॉजीस्ट डॉ सुयोग तन्नीवार,अभिजीत देशमुख, अस्थिरोग तज्ञ विभाग प्रमुख डॉ दिपक अग्रवाल, डॉ अमर, डॉ सी डी सारंग,डॉ मधुकर पवार, गोदावरी नसिर्ंंगचे उप्रपाचार्य रविंद्र पुराणिक, गोदावरी आय एम आरचे संचालक डॉ प्रशांत वारके, रूग्णालय व्यवस्थापक राजेंद्र नेमाडे, न. मो महाजन, अशोक भिडे, अशोक बर्हाटे, मार्केटींग विभाग प्रमुख रत्नशेखर जैन, जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी बालरोग अतिदक्षता विभागात सुत्रसंचालन व आभार डॉ सिध्दीका मेनन हीने केले. तसेच यावेळी माजी खासदार यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्या भावीवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यातच तज्ज्ञांनी देखील मार्गदर्शन केले.