बाल संत समारोह उत्साहात

0

भोसरी – संत निरंकारी मिशनच्यावतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे रविवारी पुणे झोनचा बाल संत मेळावा उत्साहात पार पडला. या सत्संग मेळाव्यास 2500 हून अधिक बालक-पालक विविध भागातून उपस्थित होते. या सत्संग सोहळ्यात मुंबई येथील अमित चव्हाण म्हणाले की, मुलांना तसेच पालकांना समजावले की हा सत्संग मुलांना व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी नाही तर या बाल समारोहाचा मूळ उद्देश हा आहे. आपल्या सर्वांना सद्गुरूने दिलेल्या ब्रह्मज्ञानासोबत जोडून राहणे आहे. बाल समागम मध्ये मुलांनी अवतारवाणी गायन, हरदेववाणी गायन, कवी दरबार, नाटिका, गीत, प्रश्‍नमंजुषा, विचार याद्वारे सदगुरुचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवन्याचा प्रयत्न केला. मुलांनी तयार केलेली बाल प्रदर्शनी या समागमाचे विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी मोहिते, गर्ग सचदेवा यांनी केले.