जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांचे आवाहन
चाळीसगाव – संपूर्ण देशात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असे महिनाभर राबविला जाणारा पूरक आहार सकस आहार कार्यक्रमाची सुरुवात चाळीसगाव येथील अनिलनगर या भागात करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या नगरसेविका विजया पवार होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजाऊ महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्ष मनीषाताई पाटील आणि पर्यवेक्षिका लताताई जाधव आदी उपस्थित होत्या. चिमुकल्यांनी सकस आहार असलेल्या दहीहंडीचा आनंद लुटला 6 वर्ष वयापर्यंत मुलांची वजन तपासणी तसेच ‘बेटी बाचाव, बेटी पढाओ’ हा कार्यक्रम झाला.
पोषण आहार याबद्दल मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषाताई पाटील यांनी अध्यक्ष भाषणात महिलांना पोषण आहार याबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले कि बाळंतपणात महिला बाळाची आणि स्वतःची काळजी घेतात तशीच बाळंतपणानंतर घेणे जरुरी आहे. सकस आहार कॅलसिम आयर्न वाडी साठी औषध व फळं सेवन करणे आवश्यक आहे किशोरवयीन मुलींना अ भ्यासचा ताण तणाव समाजातीलसमस्या व सं कट व टीवी मोबाईल मुले तरुण मुलींचेय जगण्याचे तंत्र बिघडले आहे. असा वेळी आईने तिच्या शारीरिक व मानसिकटेकाडे लक्ष देणे जरुरी आहे. मेनोपओज नंतर हि महिलांनी स्वतःची काळजी घेणे जरुरी आहे.
सकस आहार प्रभात फेरीचे आयोजन
नगरसेविका विजयाताई पवार यांनी सांगितले कि, महिला सक्षम असल्या तर प्रत्यक क्षेत्रात भाग घेऊ शकता म्हणून सकस आहार घ्या, कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी काढून आणि दिपप्रज्ज्वलाने करण्यात आली. पूरक पोषण आहार बालविकास प्रकल्प भुसावळ यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पोषण आहाराबद्दल चित्रफीत दाखवण्यात अली. सूत्रसंचालन भारती जाधव, पल्लवी निकम यांनी केले. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका भारती जाधव, पल्लवी निकम, वनिता अहिरे, योजना ब्रह्मणकर, उज्वल मराठे, सुनीता कासार, मंगला हांडे, रेखा चव्हाण, उर्मिला कपूर, पंचफुला शोभोकर, जयश्री जाधव यांनी परिश्रम घेतले.