बाळकृष्णबुवा पाटील यांचा गुरुपूजन सोहळा

0

कर्जत : कर्जत तालूक्यातील भजन सम्राट बाळकृष्ण बुवा पाटील यांचा गुरुपूजन सोहळा रविवारी डिकसळ येथे मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी अनेक मान्यवर व शिष्यगण उपस्थित होते. ह. भ. प. कै. बबनबुवा पाटील आणि गजानन बुवा पाटील यांच्या कृपा आशीर्वादाने श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ डिकसळ यांच्यावतीने या गुरुपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाळकृष्णबुवा पाटील यांचा हा 35 वा गुरुपुजन सोहळ्याचा कार्यक्रम होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले तर त्यांच्या अनेक शिष्य गणांनी अभंग सादर केले.

यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर जाधव महाराज, अध्यक्ष स्थानी काशिनाथ बुवा लबडे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, दत्ताञेय बुवा काटे, वारे सर, कर्जत केयेथील के .बी.म्हाञे, डॉ.एम.आर.पाटील, गो.रा.चव्हाण,किशोर गायकवाड, उपसरपंच दिनेश भासे, सुभाष पाटील, गुलकंद भोईर, अरुण आहीर, अनंता तलपे, गणेश सावंत, रामदास म्हसे, शशिकांत शेळके, अशोक थोरवे, विजय पाटील, संजय पाटील, सिध्देशर पाटील, आदी मान्यवर व शिष्यगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.