बाळांनाही कळते तुम्ही काय चीज आहात ते…

0

वॉशिंग्टन: आठ-नऊ महिन्यांच्या लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय याची पूर्ण जाणीव असते. मुले आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांच्या वर्तनाचा आणि सवयींचा अभ्यास करीत असतात. महत्वाचे म्हणजे एकदा जरी धोका दिलात तरी ही बाळे आपल्याला त्यांच्या ‘गुडबुक’मधून काढून टाकतात.

आठ महिन्यांच्या मुलांचे निरीक्षण बारीक असते. माणूस काय करतो हे ते पहात असतात. वॉशिंग्टन विद्यापीठातील लोरी मार्कसन यांनी याबाबत अभ्यास केला आहे. कुणी बोलत असेल तिकडेही बाळांचे लक्ष असते. हा माणूस पुढे काय करेल, त्याच्या सवयी कशा आहेत हे ही मुले लक्षपूर्वक शिकत असतात.

मार्कसन सांगतात, मुले पॅटर्न अभ्यासतात. त्यावरून अमूक एक व्यक्ती काय करेल त्याचा अंदाज बांधतात. गणितात संभाव्यता (प्रोबॅबिलिटी) हे शास्त्र आहे. नेमका त्याचाच वापर ही बाळे करतात. मात्र एकदा जरी माणसाने विरूद्ध कृती केली तर बाळे त्या माणसाबद्दल आखलेले मत रद्द करतात. म्हणूनच बाळांसमोर आपण एकदा वर्तन ठेवतो तसेच न ठेवल्यास त्याच्या ‘गुडबुक’मधून आपण बाद होतो.