…बाळाच्या हुंकारांना वेगवेगळे ‘अर्थ’ असतात

0

‘आमचं बाळ दीडदोन वर्षाचं होत आले पण अजून नीटसं बोलत नाही.’ ‘आमचं बाळ तर वर्षाचं झालं आणि बोलायला लागलं हो.’ .. अशी वाक्यं जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा दोन बाबांमध्ये तुलना होत एकाला हुशार ठरवलं जातं तर दुसर्‍याला ‘स्लो लर्नर’ म्हणून संबोधलं जाते. पण असं काही एक नाहीये. ज्या घरात बाळाचे आईबाबा वा इतर व्यक्ती ‘संवाद’ साधत बाबाच्या प्रत्येक हुंकारांना छानसा प्रतिसाद देतात तेव्हा त्यांची शब्दसंपत्ती तशीतशी वाढत जाते, हा अनुभव आहे. त्यासंबंधीचा अभ्यास केला असता असं आढळलं की, जी बाळं तिसर्‍या, चौथ्या वा त्यानंतरच्या महिन्यांमध्ये जे हुंकार देत असतात, जो प्रतिसाद देत असतात त्यातून त्यांना काही सांगायचं असंत. काही सूचना करायच्या असतात. पण त्यांच्याकडे ‘शब्द’ नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. जे आईबाबा त्या काळात बाळाच्या हुकारांना प्रतिसाद देतात. वा तो खेळत असताना त्याच्याशी बोलतात तेव्हा ते सारे शब्द त्याच्या मेंदूतील आकलन व स्मरण केंद्रात जात साठवले जातात.

त्यामुळे ते बाळ सव्वा दीड वर्षाचं झालं की बोलू लागतं. खूपदा आपण न शिकवलेले शब्दही बोलतं वा जे विविध आवाज त्याच्या कानावर पडतात ते ते काढण्याचा प्रयत्न करतो. अगोदर शब्द मग छोटी वाक्य व हळूहळू भाषा-असा तसा प्रवास सुरू होतो. विशेष म्हणजे ज्या घरात एकापेक्षा जास्त वा दोन वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्याही भाषा बाळ आत्मसात करत साठा करुन ठेवलेले शब्द योग्य जागी वापरतो.

‘मेंदूविज्ञान’ शाखेचा अभ्यास करणारे याबाबतीत असं सांगतात की, बाळाच्या मेंदूतील ‘ब्रोका’ आणि ‘वर्निक’ ही जी दोन क्षेत्रं आहेत. त्यातील ‘वर्निक’ क्षेत्राचं जेवढं भरण पोषण होईल. तेवढी बाळाची ‘आकलन क्षमता’ वाढत त्याच्या भाषा शिकण्याचा वेग वाढेल. ‘फक्त त्यासाठी आईबाबांसह घरातील सर्वांनी त्यांच्या हुंकारांना प्रतिसाद देत खूप बोललं पाहिजे.

– चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538