मुंबई | अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पारस औष्णिक वीज प्रकल्पांतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येत असून शासनामार्फत त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.
वरील विषयान्वये लक्षवेधी सदस्य विनायक मेटे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात महानिर्मिती कंपनीकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये अर्हतारहित प्रकल्पग्रस्त उमेदवारांना तांत्रिक प्रशिक्षण देणे, रोजगारासाठी प्रगत कुशल प्रशिक्षण देणे व प्रशिक्षण काळात विद्यावेतन देणे, ४५ वर्षाची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना निर्वाह भत्ता देणे, एकरकमी अनुदान योजना, भरतीमध्ये अतिरिक्त राखीव जागा व अतिरिक्त गुण देणे आदी सवलती देण्यात येत आहेत.