मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.
बाळासाहेबांचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. म्हणूनच या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला गेला असून त्यावर कामही सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.