मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर राज्यातील लाखो शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं असून बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू असं म्हटलं आहे. तसेच ‘दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे कार्यरत होतो’ असं म्हणत आठवणींना उजाळा दिला आहे.
छगन भुजबळ यांनी ‘दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेबांसोबत मी 25 वर्षे कार्यरत होतो. शिवसेनेचे चढ-उतार, लढाई होत्या त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होत होतो. त्या सर्वाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करुया’ असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.