अंबाजोगाई, माजलगावला होणार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ सभा
अंबाजोगाई : आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर अंबाजोगाई, माजलगाव येथे सभेसाठी येणार असून सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारिपचे पूर्व बीड जिल्हा अध्यक्ष प्रा. बळीराम सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची लाट आहे. सर्व जागा वंचित बहुजन आघाडी चांगल्या मताधिक्याने जिंकणार असून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी त्यांना बळ द्यायचे आहे.
अंबाजोगाई शहरातील मोंढा मैदान या ठिकाणी दि. 7 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता तर माजलगावला मोंढा मैदान दुपारी 1 वाजता बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रा. विष्णू जाधव यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या होणाऱ्या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा पूर्व अध्यक्ष प्रा. बळीराम सोनवणे यांनी केले आहे.