बाळासाहेब जीवंत असते तर महाराष्ट्रातली एकही शाळा बंद करण्याची वेळ आली नसती

0

रावेरला हल्ला-बोलच्या व्यासपीठावरुन खासदार सुप्रियाताई सुळे

रावेर :- बाळासाहेब जीवंत असते तर महाराष्ट्रातली एकही शाळा बंद करण्याची वेळ आली नसती असा मार्मिक टोला सत्तेत असलेल्या शिवसेनेला रावेरच्या हल्ला-बोलच्या व्यासपीठावरुन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लगाविला. छोरिया मार्केट येथे आज हल्ला-बोल सभा आयोजित केली होती.

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुडे , राष्ट्रवादी प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, चित्राताई वाघ, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, माजी आ.अरुण पाटील, प. स.सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, नगरसेवक राजेंद्र वानखेड़े, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, रमेश पाटील, सोपान पाटील, राजेंद्र चौधरी, सिमरन वानखेडे आदी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.