बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कल्याणमध्ये दाखल

0

कल्याण । शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. गेले वर्षभर सुरू असलेल्या बाळासाहेबाच्या पुतळ्याचे काम पुर्ण झाले असून हा पुतळा सोमवारी 2 जानेवारीला कल्याणमध्ये दाखल झाला आहे. ऐतिहासिक काळा तलाव परिसर हे पुतळ्याचे स्मारकस्थळ असणार आहे. कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्यासह शिवेसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी स्वागत करण्यात आले. शिल्पकार संताजी चौगले यांच्या कार्यशाळेत गेल्या एक वर्षापासून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. यादरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन, कामाची पाहणी करून योग्य त्या दुरुस्त्याही सुचवल्या होत्या. वर्षभराच्या मेहनतीनंतर हा पुतळा आता तयार झाला आहे.