बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या; प्रवीण तोगडीयांची मागणी !

0

मुंबई: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी प्रवीण तोगडियांनी केली आहे. नागपुरातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राम मंदिर आंदोलनात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता अशा चारजणांचा गौरव केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन करावा असेही प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे.