बाळासाहेब थोरात यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी

0

विक्रोळीचे आ. राऊत यांचे गौरवोद्गार

मुंबई : नोकरदार माणसाने केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादीत न राहता आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने कार्यरत रहायला हवे. बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत नोकरीला असतानाही गावाकडील लोकांशी नाळ कायम राखली. सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे प्रतिपादन विक्रोळीचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केले.

कराड तालुक्यातील साकुर्डी गावचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब थोरात हे नुकतेच क्रॉम्प्टन ग्रीव्हज, लि. कांजूरमार्ग या कंपनीतून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात आ. राऊत बोलत होते. यावेळी पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई, युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील, कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, माथाडी जनरल कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी संदीप सावंत, चिटणीस राजेश सोनवले, माजी नगरसेवक तावजी गोरूले, कराडचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, उपनिरीक्षक आदेश भापकर, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक पी. डी. पाटील, हणमंतराव चव्हाण, वस्ती साकुर्डीचे उपसरपंच विश्‍वास कणसे, अॅड. विश्‍वासराव निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत नोकरीस असतानाही गावाकडील लोकांशी असलेली नाळ कायम राखली. गावातील सामाजिक कार्यात ते सक्रिय राहिले. याची प्रचिती त्यांच्या सत्काराला उपस्थित असलेल्या लोकांमुळे आली. उर्वरीत आयुष्यातही ते सामाजिक बांधिलकी जपतील, असा आम्हाला विश्‍वास आहे. त्यांचे सामाजिक कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी मान्यवरांनी थोरात यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बाळासाहेब थोरात व अनुसया थोरात, या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच विश्‍वास कणसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. किसन थोरात, मनोज थोरात, मोहन थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी युनियन समितीचे सदस्य रवी नाईक, दीपक गोताल, विनोद वारडे, डिमेलो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.