चाळीसगाव – निसर्ग मित्र समिती व विंध्यासिनी शिक्षण प्रसारक मंडळ धमाणे या संस्थेतर्फे नाशिक येथे १७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परीषदेत राज्यस्तरीय पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृक्ष प्रेमींचा गौरव समारंभात आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याहस्ते येथील सावित्रीबाई शिंदे प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब पवार यांना ‘पर्यावरणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाचोरा येथील सावित्रीबाई शिंदे प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब पवार हे चाळीसगाव येथे वास्तव्यास असुन त्यांनी वृक्ष लागवडीत मोठा सहभाग घेऊन पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेवुन नाशिक येथे १७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परीषदेत आमदार सुधीर तांबे, शिक्षण उपसंचालक नाशिक रामचंद्र जाधव, डॉ.तुषार शेवाळे मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण पुरस्काराने शिक्षक बाळासाहेब पवार यांचा गौरव करण्यात आला. श्री.पवार यांना यापूर्वी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. दिव्यांग बांधवांना मदत तसेच गोरगरीब रुग्णासाठी मोठे कार्य त्यांचे आहे. त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.