लोणावळा : नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फाटक यांची शिवसेनेच्या मावळ तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मावळ तालुका संपर्क प्रमुख गणेश जाधव, पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, महिला जिल्हा संघटक शादान चौधरी, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सल्लागार भारत ठाकूर, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख महेश केदारी, संघटक सुरेश गायकवाड, उपतालुक प्रमुख आशिष ठोंबरे हे उपस्थित होते.