बाळासाहेब ‘शूर’होते; मोदींनी वाहिली आदरांजली !

0

नवी दिल्ली-हिंदुहृदयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची आज ९३ वी जयंती. जयंतीनिमित्त बाळासाहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. मोदींनी ट्विटवरून बाळासाहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते कायम लोकांसाठी काम करायचे असे सांगितले आहे.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये बाळासाहेबांना ‘शूर’ म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांमधील गुणांचे कौतूकही केले आहे.’शूर नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. माननिय बाळासाहेब हे कायमच जनतेच्या भल्यासाठी आणि हक्कांसाठी लढत राहिले. ते खूपच धाडसी होते. बाळासाहेब बुद्धिवान होते आणि मोजकेच पण मार्मिक बोलण्याचे त्यांना वरदान लाभले होते. त्यांच्या भाषण कौशल्याने ते लाखोंच्या जनसमुदायाला आपलसे करत असते.’